चिखलीमध्ये "विठू माऊलीच्या दारी"...संगीतमय भक्तीरसाचा अभूतपूर्व कार्यक्रम!

 श्रावण मासाची पवित्र संगीतमय सुरुवात करण्याचे आ.श्वेता महाले यांचे आवाहन
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ती संगीताचा अमृतमय प्रवास चिखली मध्ये आयोजित करण्यात आलेला असून या प्रवासामध्ये सहकारी होऊन भक्ती रसाचा आनंद घेण्याचे आवाहन चिखलीच्या आ. सौ.श्वेता.महाले यांनी केले आहे.
      " विठू माऊलीच्या दारी" असे पावन नाव असलेल्या या संगीत सफरीचे आयोजन महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आले असून, उद्या दिनांक 25 जुलै 2025 रोजी संध्याकाळी सहा वाजता परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान सभागृह चिखली येथे प्रा.राजेश सरकटे व त्यांचा संच हे भक्ती पर्व संगीतमय करणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे मुंबईचे प्रसिद्ध संगीतकार व गायक प्रा. राजेश सरकटे,सुप्रसिद्ध गायिका पायल सरकटे, अमृता नातू यांच्या अप्रतिम आवाजाने ही मैफिल रंगणार असून,दिलीप खंडेराव आणि त्यांचा संच यांचे कडून भक्ती नृत्याचा अविष्कार घडवून आणला जाणार आहे. त्याचप्रमाणे अजय शेंडे आणि त्यांचा संच यांच्याकडून कथ्थक नृत्यविष्कार सादर केला जाणार आहे.विठू माऊलीच्या भक्तीरसाने रंगणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये वीस कलावंताच्या सुसज्य कार्यक्रम व सोबत दिंडी नृत्यही अनुभवायला मिळणार आहे.
 नुकताच संपलेल्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल दर्शनाची धुंदी अजूनही मनामध्ये ताजीच असताना, पवित्र श्रावण मासाच्या सुरुवातीलाच विठ्ठल भक्तीने ओतप्रोत विठू माऊलीच्या दारी या कार्यक्रमात भक्तीरसाने चिंब  होण्याची संधी चिखलीकर व परिसरातील नागरिकांनी व श्रोत्यांनी घ्यावी असे आवाहन आ.सौ.श्वेता महाले यांनी केले आहे.
Previous Post Next Post